वर्धा पत्नीची हत्या करून जवानाची आत्महत्या

659

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरातील दारूगोळा भांडरात राहणाऱ्या जवानाने पत्नीची गोळी घालून हत्या केली. या जवानाने नंतर स्वतःला सुद्धा गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अजय कुमार सिंग असे त्या जवानाचे तर प्रियंका असे त्याच्या मृत पत्नीचे नाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजयसिंग हा मूळचा बिहार येथील रहिवासी असून तो पुलगाव येथील दारुगोळा भांडार येथे कार्यरत आहे. तो बुधवारी रात्री ड्युटीवरून घरी आला. यानंतर त्याच्या घरातून गोळी चालण्याचा आवाज आल्याने कॅम्प परिसरात खळबळ उडाली. कॅम्पमध्ये राहणाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. दोघांना तत्काळ कॅम्पमधाल सैनिकांनी रुग्णलायत नेण्यात आले. यावेळी सैनिकांची पत्नी प्रियंका हिचा अगोदरच मृत्यू झाला होता. यात अजयकुमार याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सावंगी रुग्णलयात नेण्यात आले.

सकाळी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. यात फॉरेन्सिक चमूकडून आणखी काही माहिती मिळते का याची चौकशी केली जाणार आहे. घरात रक्ताचा सडा आणि साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यावेळी पोलीसांना ज्या बंदूकीने केला ती बंदूक सापडली आहे. घटने मागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. चौकशी सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा केला जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी दिली. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर ही बाब स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. नेमके कारण कुटुंबीय आल्यावर काही मिळते का या प्रतीक्षेत पोलीस आहे. कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या