
>> वर्णिका काकडे
28 मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा करीत या दिवशी मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणजे पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्सचा वापर. अशा पॅड्सचे निर्माण करणाऱया महिला उद्योजकांची ही यशोगाथा.
वयाच्या साधारण 13-14च्या वर्षापासून रजोनिवृत्ती होईपर्यंत महिलांच्या आयुष्यात मासिक पाळीचं महत्त्व राहतंच. स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला होणारा हा बदल तिच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा. म्हणूनच दरवर्षी 28 मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी याकरता साजरा केला जाते. या दृष्टीने स्त्रियांना सुरक्षित, परवडणारी आणि टिकाऊ मासिक पाळी आरोग्य उत्पादने उपलब्ध करून देणे हे सार्वजनिक आरोग्य प्राधान्यांपैकी एक असायला हवे यासाठी प्रयत्न केले जातात. यातीलच महत्त्वाचा भाग म्हणजे ‘डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्स’.
‘मेन्स्ट्रुअल हायजीन अलायन्स ऑफ इंडिया’च्या मते भारतात दरवर्षी सुमारे 12 अब्ज डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्स तयार होतात. सध्या या पॅडच्या विघटन क्रियेबाबत बरीच चर्चा दिसून येते. प्रत्येक पॅडला विघटित होण्यासाठी 800 वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो असं सांगितलं जातं. याचं कारण हे पॅड तयार करण्यासाठी प्लॅस्टिकचा होणारा वापर. सॅनिटरी पॅडच्या वापराचे प्रमाण पाहता या प्लॅस्टिकमुळे कचराभूमी, जलस्रोत आणि त्यांच्या आजुबाजूच्या पfिसरावर, जैवविविधतेवर याचा किती परिणाम होत असेल याचा अंदाज येऊ शकतो.
खरंतर सर्वच स्तरात प्लॅस्टिकचा अमर्याद वापर दिसून येतो. मात्र तो नष्ट होण्यात काही अंशी तरी हातभार लावता येईल या उदात्त हेतूने जयपूर व हैदराबाद येथील दोन उद्योजिका पुढे आल्या. सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून मासिक पाळीची स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण या पैलूंवर उपाययोजना करीत त्यांनी ‘वॉलमार्ट वृद्धी’ ही जागतिक पातळीवर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) प्रशिक्षण देणारी संस्था. याच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायाचा पाया बळकट करणाऱया या दोघी म्हणजे ‘सॅनिट्री‘च्या सह-संस्थापिका इशू सैनी आणि ‘अपना ग्रीन प्रॉडक्ट्स‘च्या संस्थापक अरुणा दारा.
महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत मासिक पाळीच्या काळात अनुकूल ठरेल अशा कापडी पॅडचे उत्पादन ‘सॅनिट्री’ या ब्रँड अंतर्गत घेतले जाते. या सॅनिट्री’ सह-संस्थापिका आहेत इशू सैनी, ज्यांनी भारतीय महिलांना या माध्यमातून उत्तम पर्यावरणपूरक असा पर्याय दिला आहे. पुनर्वापरयोग्य, जैवविघटनशील असे हे कापडी पॅड्स कचऱयाचे चक्र पूर्णपणे संपुष्टात आणतात. महिलांना रोजगार उपलब्ध करून देत संस्थेच्या ‘हर शक्ती सेंटर’मध्ये हे पॅड तयार केले जातात. पूर्णत प्लॅस्टिकमुक्त पॅकेजिंग असलेले हे प्रत्येक पॅड दोन वर्षांपर्यंत टिकते हे याचे मुख्य वैशिष्टय़.
महिलांच्या मासिक खर्चात बचत होत स्वच्छतेच्या व वापराच्या दृष्टीने अतिशय सुलभ असे हे पॅड आहेत.पर्यावरणाच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. सॅनिट्रीचे पॅड्स वापरल्याने एक महिला तिच्या आयुष्यभरात शेकडो डिस्पोजेबल पॅड्सचा कचरा कमी करते. हे निश्चितच दुर्लक्ष करण्याजोगे नाही. वॉलमार्ट वृद्धीमुळे मार्गदर्शनद्वारे सॅनिट्रीने वर्षभरात जवळपास 1 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. एका उद्योजिकेला डिस्पोजेबल नॅपकिनच्या मूळ रचनेवरच पुनर्विचार करण्यास प्रवृत्त केले. ‘अपना ग्रीन प्रॉडक्ट्स’च्या संस्थापक अरुणा दारा यांच्या लक्षात आले की, यावरील तेव्हाच प्रत्यक्षात स्वीकरला जाईल जेव्हा तो सुलभ आणि परवडणारा असेल. प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिन्समुळे उद्भवणाऱया पfिरणामांवर आधारित शोधनिबंधासाठी एका मैत्रिणीला मदत करत असताना दारा यांना या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे याची जाणीव झाली. कॉर्पोरेट टेलिकॉममधील नोकरी सोडून त्यांनी हैदराबादमध्ये ‘अपना ग्रीन’ची स्थापना केली. केळीच्या तंतूंपासून नैसर्गिकरित्या विघटित होणाऱया सॅनिटरी पॅडची निर्मिती त्यांनी सुरू केली. 7 ते 8 रुपये इतक्या वाजवी किंमतीला उपलब्ध असणारे हे पॅड माती किंवा पाण्यात कोणतेही विषारी रसायन सोडत नाहीत. अरुणा यांनी हैदराबादमधील शाळांमध्ये याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली. आता हा उपक्रम देशातील पाच राज्यांमध्ये 13 उत्पादन केंद्रांसह एका मोठय़ा उद्योगाच्या स्वरूपात विकसित झाला आहे. यात सामाजिक-आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील 300 महिलांना रोजगार मिळाला आहे. या उपक्रमाला केंद्र सरकारचा ‘प्रज्वला चॅलेंज’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार तळागाळातील सामाजिक समस्यांवर मोठय़ा प्रमाणावर काम करणाऱया उद्योजकांना दिला जातो.
इशू आणि अरुणा यांनी व्यवसायासोबत पर्यावरण व सामाजिक भान जोपासले आहे. भारतातील मासिक पाळीच्या स्वच्छतेला आव्हान न समजता अशा माध्यमातून केलेले उपाय निश्चितच स्तुत्य म्हणायला हवेत. निसर्गाने स्त्रीला जसे घडवले आहे त्याच स्वरूपात याला उत्तर देण्यासाठी या दोन महिलांनी घेतलेला हा पुढाकार समस्त स्त्रीजगताला उभारी देणारा म्हणायला हवा. मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त अशा अर्थपूर्ण उपक्रमांचे आपण स्वागत करायला हवे.




























































