शेतकऱ्यांवर दबाव टाकणे सोडून द्या! वरुण गांधींकडून पुन्हा भाजपला ‘घरचा आहेर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
varun-gandhi

केंद्रातील सत्ताधारी भाजपला खासदार वरुण गांधींनी पुन्हा ‘घरचा आहेर’ दिला आहे. लखीमपूर खेरीतील शेतकऱयांना गाडीखाली चिरडण्याच्या अतिरेकावरून भाजप सरकारवर टीका सुरू ठेवत त्यांनी गुरुवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. व्हिडीओमध्ये वाजपेयी हे तत्कालीन सरकारला शेतकऱयांवर दबाव टाकणे सोडून देण्याचे आवाहन करीत आहेत.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी हत्याकांडावरून देशभर संतापाचे वातावरण आहे. याचवेळी वरुण गांधी हे भाजपचे खासदार असूनही शेतकऱयांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीकेची तोफ डागत आहेत. गुरुवारी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वाजपेयी हे शेतकऱयांवरील अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करताना दिसत आहेत. मी सरकारला इशारा देतो की, दबाव टाकण्याच्या प्रकार सोडून द्या, घाबरण्याचा प्रयत्न करू नका, शेतकरी घाबरणारा नाही. आम्हाला शेतकऱयांच्या आंदोलनाचा पक्षीय राजकारणासाठी वापर करायचा नाही, परंतु त्यांच्या योग्य मागण्यांचे समर्थन करतो. सरकारने जर कायद्याचा दुरुपयोग करून शांततेने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱयांच्या संघर्षात उडी घेण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, असे वाजपेयींनी तत्कालीन सरकारला बजावले होते. त्यांच्या या भूमिकेचे जाहीर समर्थन करीत वरुण गांधींनी भाजपला धक्का दिला आहे.

वाजपेयी मोठय़ा मनाचे नेते; मोदींना लगावला टोला

n जाचक पृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी अनेक महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र पेंद्राने तिन्ही पृषी कायदे जैसे थे ठेवले आहेत. त्यावरून केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत असताना वरुण गांधींनी अटलबिहारी वाजपेयींच्या आठवणीला उजाळा दिला आहे. वाजपेयींचा 41 वर्षांचा जुना व्हिडीओ शेअर करीत त्यावर ‘मोठय़ा मनाच्या नेत्याचे समजदार शब्द’ असे कॅप्शन लिहिले आहे. त्यामुळे हा मोदींनाच टोला असल्याचे स्पष्ट झाले आहे.