वसईत कोरोनाचे तीन नवीन रूग्ण सापडले , रूग्णांची एकूण संख्या पाच

429

वसईतील करोना बाधीत तरुणाच्या तीन मित्रांनाही कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले आहे. यामुळे वसईतील करोना बाधीत रुग्णांची संख्या आता 5 एवढी झाली आहे. दुबईहून वसईत आलेल्या एका तरुणाला करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले होते.

या तरुणाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल शनिवारी संध्याकाळी मिळाला. यानंतर तिन्ही मित्रांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. या सर्वांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नव्याने लागण झालेल्या तिघे जण पंचविशीच्या वयोगटातील असून त्यात एका तरुणीचा समावेश आहे. या तरुणांच्या घरच्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. सध्या पालघर जिल्ह्यातील 680 जणांना अलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांचे दररोज अहवाल घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या