
वसई-विरार महापालिकेच्याअतिक्रमण विरोधी पथकाने आज धडक कारवाई करून 27 हजारचौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.पालिकेच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकामवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शहारातील अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रभाग समिती ‘जी’च्या सहाय्यक आयुक्त नीलम निजाई, कनिष्ठ अभियंता कौस्तुभ तामोरे यांच्यानेतृत्वाखाली पथकाने चिंचोटी, ससूनवघर, जूचंद्र, कामणपरिसरात कारवाई केली. औद्योगिक गाळे, चाळी आदीजमीनदोस्त करण्यात आल्या. दरम्यान शहरात एकही अनधिकृत बांधकाम उभे राहू देणार नाही ही कारवाई सतत सुरूच राहील,अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटीलयांनी दिली.


























































