Receipe कुरकुरीत, चुरचुरीत! श्रावणात बनवा ही जबरदस्त रेसिपी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्य – अळूच्या पानांचे देठ, चिंच किंवा कोकम, लसूण किंवा लसणाची पेस्ट, लिंबाचा रस, लाल तिखट, हळद, मीठ, रवा, तांदळाचं पीठ, तेल

कृती –  ही रेसिपी अळूच्या पानांच्या देठांपासून बनवली जाते. त्यामुळे सर्वप्रथम, हाताला तेल लावून घ्या जेणेकरून हाताला खाज सुटणार नाही. त्यानंतर अळूच्या पानांच्या देठांचे बोटाच्या आकाराचे तुकडे करून घ्या आणि त्यांची साल काढून घ्या. त्यानंतर चिंच किंवा कोकम, थोडे मीठ घालून उकडून घ्या आणि नंतर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर स्वच्छ धुवलेल्या देठांना ठेचलेला लसूण किंवा लसणाची पेस्ट, लिंबाचा रस, लाल तिखट, मीठ आणि हळद लावून व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवून द्या. त्यानंतर कोटिंग तयार करुन घ्या. त्यासाठी एका भांड्यात रवा, तांदळाचं पीठ, मीठ आणि लाल तिखट एकत्र करून कोटिंगचे मिश्रण तयार करा. मॅरिनेट केलेले देठ या कोटिंगच्या मिश्रणात व्यवस्थित घोळवून घ्या. आता मध्यम आचेवर एका बाजूने 5 ते 6 मिनिटे आणि दुसऱ्या बाजूने 5 ते 6 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्या.