
राजस्थानमधील एका भाजी विव्रेत्याला 11 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. अमित सेहरा असे या भाजी विव्रेत्याचे नाव आहे. त्याने मित्राकडून उधार पैसे घेऊन बठिंडामधील एका दुकानातून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्याने पंजाब राज्य लॉटरी-दिवाळी बंपर 2025 चा पहिला पुरस्कार जिंकला आहे. अमित हा जयपूर येथील कोटपुतली येथे राहायला आहे.
हाशमी अमेरिकेत लेफ्टिनेंट गव्हर्नर
अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतात हिंदुस्थानी वंशाची गजाला हाशमी यांची लेफ्टिनेंट गव्हर्नर म्हणून निवड झाली आहे. राज्याच्या या प्रमुख पदावर पोहचणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम आणि दक्षिण आशियाई मूळच्या महिला ठरल्या आहेत. 61 वर्षीय डेमोव्रेट नेत्या गजाला हाशमी यांनी लेफ्टिनेंट गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे नेते जॉन रीड यांचा पराभव केला.
फिलिपिन्समध्ये कलमागी वादळामुळे 52 जणांचा मृत्यू
फिलिपिन्समध्ये आलेल्या शक्तिशाली वादळ कलमागीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या वादळामुळे आतापर्यंत 52 लोकांचा मृत्यू झाला असून 13 लोक अजूनही बेपत्ता आहेत. सर्वात जास्त नुकसान सेबू प्रांतात झाले आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. कलमागी वादळामुळे 120 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहिले.
मालदीवमध्ये धूम्रपानास बंदी, 2.88 लाखांचा दंड
मालदीव सरकारने संपूर्ण देशात धूम्रपान करण्यास बंदी घातली आहे. देशात 1 नोव्हेंबरपासून नवीन कायदा लागू करण्यात आला असून सिगारेट, तंबाखू किंवा ई-सिगारेटचा वापर करताना कोणी आढळल्यास त्याला 5 हजार मालदिविन रूफिया तर दुकानदार हे विक्री करताना आढळल्यास 50 हजार मालदिविन रूफिया म्हणजेच 2.88 लाखांचा दंड आकारला जाणार आहे.
पाकिस्तानात 1200 वर्षे जुने हिंदू मंदिराचे अवशेष
पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वातपासून तक्षशिलापर्यंत आठ नव्या प्राचीन स्थळांमध्ये सुरू असलेल्या उत्खननादरम्यान बारिकोटमध्ये 1200 वर्षे जुन्या हिंदू मंदिराचे अवशेष सापडले आहेत. जे अवशेष सापडले आहेत यामध्ये बुद्धांच्या अनेक मूर्ती, एक मोठा स्तूप आणि 1200 वर्षे जुन्या हिंदू मंदिराचे अवशेष यांचा समावेश आहे.


























































