
एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची मुदत 30 जून रोजी संपली असून, 1 जुलैपासून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू झाली आहे. परिवहन मंडळाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरात वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली असून, नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
बुधवारी (दि. 1) शहरातील मुख्य चांदणी चौक परिसरात अधिकाऱयांनी थेट रस्त्यावर उतरून कारवाईला सुरुवात केली. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी रूपाली खडसे, प्रणिता मुनफन, प्राजक्ता खोमणे, महेश भोजने, लक्ष्मण थोरात, तसेच वाहनचालक दीपक सौरनार, छबुराव भिसे आणि राजाराम राठोड यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.




























































