Venezuela – काराकासमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ अंदाधुंद गोळीबार, हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय

व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे राष्ट्रपती भवनाजवळ अचानक गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शहरात झालेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर तात्काळ व्हेनेझुएलाच्या सैन्याने हवाई संरक्षण प्रणाली कार्यान्वित केली. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्यानंतर सैन्य सतर्क झाले. सैन्याने अँटी-एअरक्राफ्ट शस्त्रांचा वापर करून हा ड्रोन पाडल्याची माहिती आहे.

ड्रोन पाडल्यानंतर व्हेनेझुएलाचे सैन्य अलर्ट मोडवर आहे. बख्तरबंद वाहने आणि मोठ्या संख्येने सैन्यदल राष्ट्रपती भवनाच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे. सरकारने राष्ट्रपती भवनाच्या वर ड्रोनची उपस्थिती आढळल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.