Chalapathi Rao Death प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने ठसा उमटवलेले अभिनेते चलवती राव (Chalapathi Rao) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चलपती राव यांना त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही बातमी समोर येताच कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

चलपती राव गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे चित्रपट क्षेत्रापासून दूर होते. त्यांनी 600हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. एनटी रामाराव, कृष्णा, अक्कीनेनी नागार्जुन, चिरंजीवी आणि व्यंकटेश या सुपरस्टार अभिनेत्यांच्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता आणि गँगस्टरच्या भूमिका त्यांनी केल्या होत्या. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

दरम्यान, चलपती राव यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही हात आजमावला होता. सलमान खान याच्या ‘किक’ या चित्रपटात ते दिसले होते.