जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांना रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात आणले आहे. त्यांना कोणतीही गंभीर आरोग्याची समस्या नाही, असे कौटुंबिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन दिग्दर्शित “21” या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात ते अगस्त्य नंदांच्या आजोबांची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट अरुण खेतरपाल यांच्या कथेवर आधारित आहे, ज्यांना 1971 च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. अगस्त्य नंद अरुण खेतरपाल यांची भूमिका साकारणार असून डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.