ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन

2428

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयदीप यांनी सुपरहिट चित्रपट ‘शोले’मध्ये साकारलेली सूरमा भोपाली ही भूमिका विशेष गाजली.

बाल कलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणारे ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेता अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र स्टारर ‘शोले’ या चित्रपटात सूरमा भोपालीची भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्यांचे मूळ नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी असे होते.

screenshot_2020-07-08-23-13-31-566_com-twitter-android

जगदीप यांनी ‘पुराण मंदिर’ आणि ‘सामरी’ यांसारख्या अनेक भयपटांमध्ये काम केले आहे. प्रतिभावान अभिनेत्याने बी. आर. चोप्राच्या ‘अफसाना’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरची त्यांनी सुरुवात केली होती. नंतर त्यांनी ‘अब दिल्ली दूर नहीं,’ आर पार’, ‘दो बीघा जमीन ‘आणि’ हम पंछी एक दल के’ सारख्या चित्रपटांना त्यांनी चार चांद लावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या