कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टीनंतर प्रकृती स्थिर

हिंदुस्थानला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांना गुरूवारी मध्यरात्री हदयविकाराचा झटका आला. नवी दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

आता कपिल देव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉ. अतुल माथुर यांच्या टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कपिल देव लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी जगभरातील चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

कपिल देव यांच्या छातीमध्ये गुरुवारी मध्यरात्री दुखू लागल्यानंतर नवी दिल्ली येथील ओखला विभागात असलेल्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ कोरोनरी अँजिओप्लास्टी शस्त्र्ाक्रिया केली. त्यानंतर कपिल देव यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या