ज्येष्ठ भावगीत गायक विनायक जोशी यांचे निधन

622

ज्येष्ठ भावगीत गायक व डोंबिवली चतुरंगचे प्रमुख कार्यकर्ते विनायक जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. इंदोर येथील कार्यक्रम आटोपून येत असताना त्यांना प्रवासातच हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.

स्वरभाव यात्रा, सरींवर सरी, बाबूल मोरा, चित्रगंगा, गीत नवे गाईन मी, तीन बेगम आणि एक बादशहा यांसारख्या असंख्य सांगितीक कार्यक्रमांचे ते संकल्पक होते. विनायक जोशी यांचे शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्राथमिक शिक्षण पं. एस. के. अभ्यंकर यांच्याकडे झाले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांच्याकडे सुगम संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर गझल गायनासाठी पं. विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

इंदोर येथे श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते डोंबिवलीस परतत होते. वाटेतच धुळ्याजवळ त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या