‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय विकी कौशल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘उरी’ चित्रपटातील दमदार अभियनानंतर अभिनेता विकी कौशल हा देशातील तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. नुकतेच विकीचे त्याची गर्लफ्रेंड हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाले. हरलीनसोबत ब्रेकअपनंतर आता पुन्हा विकी प्रेमात पडला असल्याचे समजते. सध्या विकी अभिनेत्री मालविका मोहनन हिला डेट करत असल्याची चर्चा बिटाऊनमध्ये रंगली आहे.

malvika-mohnan-2

मालविका हिने प्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक माजिद माजिदीच्या बियाँड द क्लाऊड या चित्रपटात काम केले आहे. मालविका व विकी हे लहानपणापासूनचे मित्रमैत्रिण आहेत. हरलीनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मालविका व विकी एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात विकी हा मालविकाच्या आईसोबत जेवायला बसला असून तिची आई त्याला जेवण बनविण्याच्या टिप्स देत आहे. त्या नंतर देखील एकदा विकी तिच्या घरी जेवायला गेला होता व त्याने त्याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट केलं होतं. विकीच्या बऱ्याचशा इंस्टाग्राम पोस्टवर मालविकाच्या कमेंट देखील वाचायला मिळतात.