
व्हिडिओ गेमिंग क्षेत्रातील रेस्पॉन एंटरटेन्मेंटचे प्रमुख आणि इन्फिनिटी वॉर्डचे सह-संस्थापक विन्स झाम्पेला यांचे रविवारी एका भीषण कार अपघातात निधन झाले. गेमिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘इलेक्ट्रॉनिक आर्ट्स’ने (EA) सोमवारी त्यांच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती दिली. झाम्पेला हे केवळ एक डेव्हलपरच नव्हते, तर ते एक मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गेमिंग विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील सॅन गेब्रियल पर्वतावरील एंजेल्स क्रेस्ट हायवेवर फेरारी चालवत असताना हा अपघात झाला. काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचे वाहन रस्त्यावरून घसरले आणि एका सिमेंटच्या भिंतीला जाऊन धडकले. हा अपघात इतका भीषण होती की काही क्षणांतच कारने पेट घेतला. या अपघातात झाम्पेला यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सहप्रवाशाचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिन्स झाम्पेला यांनी आपल्या कारकिर्दीत ‘इन्फिनिटी वार्ड’ आणि ‘रिस्पॉन एंटरटेनमेंट’ सारख्या नामांकित स्टुडिओंची स्थापना केली होती. त्यांनी “कॉल ऑफ ड्युटी” सोबतच टायटनफॉल , अपेक्स लेजेंड्स आणि स्टार वॉर्स जेडी यांसारख्या जगप्रसिद्ध गेमच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली होती.गेमिंग उद्योगात झाम्पेला यांचे योगदान मोठे मानले जाते.





























































