
गैर इस्लामिक पद्धतीने दाढीचं डिझाईन ठेवल्यामुळे न्हाव्यांना जेलवारी घडली आहे. फेसबुकवर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात पोलीस न्हाव्यांना अटक करताना दिसत आहेत.
हा प्रकार पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांतात घडला आहे. या प्रकरणात चार न्हाव्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचं झालंय असं की, इथल्या न्हाव्यांच्या युनियनने गैर इस्लामिक स्टाईलची दाढी ठेवण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यानंतरही या चार न्हाव्यांनी गैर इस्लामिक पद्धतीची स्टाईल ठेवत दाढी केली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात येत असल्याचं या व्हिडीओमधील संभाषणावरून कळत आहे. इतकंच नव्हे तर या चार न्हाव्यांना पाच हजार रुपये प्रत्येकी असा दंडही भरावा लागणार आहे.
दुसरीकडे स्थानिक पोलिसांनी मात्र ही घटना नाकारली असून दोन न्हाव्यांच्या भांडणामुळे हे प्रकरण घडल्याचं म्हटलं आहे. दोन न्हाव्यांच्या वादाची परिणती हाणामारीत झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
पाहा व्हिडीओ-


























































