
90 च्या दशकाचा जमानाच वेगळा होता. या दशकात जन्माला आलेल्या पिढीला एक वेगळी ओळख होती. त्यावेळचे दिवस कधीही परत येत नाही म्हणूनच ‘नाईन्टीज’मधली मुले आजही त्या दिवसांची आठवण काढतात. सोशल मीडियावर 90 च्या दशकातील आठवणींचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीयोमध्ये ब्लँक अँड व्हाइट टीव्ही, शाळकरी मुलांची नटराजची कंपास पेटी, भोवरा, शाळेची पुस्तके, गोट्या असे बरेच काही आहे. याशिवाय सायकलचे हँडल, पेप्सीची कांडी, खायची गोड भिंगरीदेखील आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘आपण ती शेवटची पिढी आहोत ज्यांनी खरं आयुष्य जगले आहे’. व्हिडीओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त गोड आठवणी.’