
सोशल मीडियावर सध्या एका 55 वर्षीय आयटीबीपी जवानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कमांडंट रतनलालसिंह सोनल हे लडाखमध्ये 17 हजार 500 फूट उंचीवर उणे 30 अंश सेल्सियस तापमानात 65 पुशअप्स मारताना दिसत आहेत. अशा वातावरणात सर्वसामान्यांना उभे राहणेदेखील कठीण आहे. कमांडंटचे धाडस आणि उत्साह बघून हिंदुस्थानींची छाती अभिमानाने फुलली आहे. आयटीबीपी हे देशातील पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. हिंदुस्थान-चीन युद्धादरम्यान 1962 मध्ये आयटीबीपीची स्थापना करण्यात आली. आयटीबीपीचे जवान प्रामुख्याने लडाखमधील काराकोरम पास ते अरुणाचल प्रदेशातील जाचेप लापर्यंत 3,488 किमी लांबीच्या हिंदुस्थान-चीन सीमेच्या रक्षणासाठी तैनात आहेत.




























































