ऑस्ट्रेलियाच्या संसदेत ‘सेक्स स्कँडल’, प्रार्थना रुममध्ये खासदारांचे सेक्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियातील संसदेतील प्रार्थना खोलीत खासदार कॉलगर्ल्सला बोलावून त्यांच्यासोबत सेक्स करत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या प्रकरणाचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात काही खासदार तसेच काही अधिकारी देखील दिसत आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

सोमवारी टॉम नावाच्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांना मुलाखत देत संसदेत सुरू असलेले कारनामे सांगितले. ‘संसदेतील खासदारांच्या शरीरसुखासाठी कॉलगर्ल्सला थेट संसदेत येण्याची परवानगी आहे. तेथील प्रार्थना रुममध्ये (prayer room) ते कॉलगर्ल्सला घेऊन जातात. तसेच यात काही सरकारी अधिकारी देखील असतात. हे अधिकारी एकमेकांचे अश्लील फोटो देखील शेअर करत असतात’ असे आरोप टॉमने केले आहेत. या आरोपानंतर खासदारांचे प्रार्थना रुममधील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात जोरदार प्रदर्शनांना सुरुवात झाली आहे. यात काही महिला खासदार देखील सहभागी झाल्या आहेत. महिला खासदार मरिसे पायने यांनी सांगितले की, ‘सरकारने या पूर्ण प्रकरणाचा तपास केला पाहिजे. सरकारने यासाठी एक उच्चस्तरीय तपास समिती स्थापन करावी’.