प्रेक्षकांची चांदी, शंकुतला देवी ऍमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित

विद्या बालनची प्रमुख भुमिका असलेला शकुंतला देवी हा चित्रपट ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले असून सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन्स व विक्रम मल्होेत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गणित तज्ज्ञ असलेल्या शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट असून त्या मानवी संगणक म्हणून त्या ओळखल्या जायच्या.


कोरोनाचा चित्रपटसृष्टीलाही फटका बसला आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांचा गुलाबो सिताबो हा चित्रपटही थेट ऍमेझॉनवर प्रदर्शित झाला होता. तसेच नुकतंच डिस्ने हॉटस्टारने आगामी काळात पाच चित्रपट थेट आपल्या ओटी प्लॅटफॉर्मव प्रदर्शित होतील असे जाहीर केले होते. त्यात अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब, आलिया भटचा सडक 2, अजय देवगणचा भूज द प्राईड या चित्रपटांचा समावेश आहे. आता विद्या बालनचा शंकुतला देवी हा चित्रपट ऍमेझॉनवर 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘शंकुतला देवी’ चित्रपटामध्येु सन्या मल्होत्रा देखील आहे. ती शंकुतला देवीच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकुतला देवीचे तिच्या मुलीसोबत जटिल, पण असाधारण नाते होते. तसेच या चित्रपटामध्ये जीशू सेनगुप्ताा आणि अमित साध हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. अनु मेनन व नयनिका महतानी यांनी पटकथा लेखन केले असून इशिता मोएत्राने संवाद लेखन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या