वाढदिवसानिमित्त विद्युत जामवालने न्यूड फोटो केला शेअर, खास कॅप्शन लिहून केली मोठी घोषणा

अभिनेता विद्युत जामवालची क्रेज तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. विद्युत जामवाल 43 वर्षांचा झाला आहे. या खास प्रसंगी विद्युत जामवालचे कुटुंबीय आणि त्याचे चाहते त्याच्या वाढदिवसाच्या आपल्या खास शैलीत त्याला शुभेच्छा देत आहेत. मात्र यावेळी अभिनेता विद्युत जामवालने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. या खास दिवशी विद्युत जामवालने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहे.

विद्युत जामवालने चक्क न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच फोटोखाली मोठं कॅप्शनही लिहिले आहे. या फोटोवर त्याचे चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे. या कॅप्शनद्वारे अभिनेता विद्युत जामवालने त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच चित्रपटाची रिलीज डेटही सांगितली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

कॅप्शमध्ये विद्युतने लिहिले आहे की, माझ्या देवाचे निवासस्थान म्हणजेच हिमालय पर्वतरांग आहे. विद्युतने हिमालयावर जाणं हे 14 वर्षांपूर्वी सुरू केले होते. दरवर्षी मी 7-10 दिवस इथे एकटा राहतो. हा माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. या आरामदायी जीवनातून जंगलात आल्यावर मी स्वतःला शोधतो. मी कोण आहे हे जाणून घेण्याच्या दिशेने ही माझी पहिली पायरी आहे. हे करताना मला स्वतःबद्दल चांगले वाटते, असं जामवालने पोस्टमध्ये लिहिले आहे.

विद्युत जामवाल या फोटोंमध्ये कपड्यांशिवाय दिसत आहे. एका चित्रात तो बसला आहे तर दुसऱ्या फोटोत तो नदीत आंघोळ करताना दिसत आहे. पुढील चित्रात तो अन्न शिजवताना दिसत आहे. दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर आता अनेक जण विद्युत जामवालचे कौतुक करत आहे.