विजय मल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करा! सीबीआय कोर्टाचे अमेरिकेतील न्यायालयाला पत्र

बँकांना कोटय़वधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या चौकशी बाबत सहकार्य करा अशी विनंती मुंबईच्या सीबीआय कोर्टाने अमेरिकेला केली आहे सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जयेश जगदाळे यांनी तशा आशयाचे पत्र अमेरिकेतील न्यायालयाला लिहिले आहे.

देशातील बँकांना ठकवणाऱया विजय मल्ल्याला आर्थिक फरारी आरोपी घोषित करण्यात आले असून परदेशातील न्यायालयात त्याच्या विरोधात खटला सुरू आहे. आज सीबीआय कोर्टात पार पडलेल्या सुनावणीवेळी सीबीआयने कोर्टात सांगितले की मल्ल्या विरोधात आणखी पुरावे गोळा करणे आवश्यक असून अमेरिकेतून हे पुरावे उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी अमेरिकेतील महाधिवत्त्यांची परवानगी मिळवणे आवश्यक आहे. यापूर्वी सुद्धा मल्ल्या बाबत काही माहिती अमेरिकेतून प्राप्त झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या