
नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱयांचा सोयाबीन नाकारला जात आहे. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून बीड येथील अखिल नावाची खासगी व्यक्ती पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
माहितीच्या मुद्दय़ाद्वारे वडेट्टीवार यांनी नाकारला गेलेला सोयाबीन थेट सभागृहात आणत पीडित शेतकऱयांची व्यथा वडेट्टीवार यांनी मांडली. चांगल्या दर्जाचा सोयाबीन जर खरेदी केंद्रावर नाकारला जात असेल तर शेतकऱयांनी जगावे की मरावे? असा प्रश्न केला. याची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पैसे घेतले जातात या आरोपाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

























































