आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, मुख्यमंत्री का उत्तर देत आहे, ते निवडणूक आयोगाचे वकील आहेत का? – विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्र्यांना का मिरच्या झोंबल्या? मतचोरीबद्दल आम्ही निवडणूक आयोगाला विचारात आहोत, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, तुम्ही का त्यांची वकिली करत आहात, असं असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह निवडणूक आयोगाची पोलखोल केली. मतदार यादीतील अनियमितता आणि घोळ त्यांनी पुराव्यांसह मांडत मतचोरी कशी झाली ते स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी ही पोलखोल केल्यानंतर खवळलेल्या भाजपवाल्यांनी त्यांच्यावर टीका केली. यावरच उत्तर देताना पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “निवडणुकीत काही काळंबेरं नव्हतं, तर निवडणूक आयोगाने आम्ही जो डेटा माहितीला तो का दिला नाही? बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या वेबसाइटवरून का काढून टाकल्या? या मागचं नेमकंकारण काय? म्हणजेच निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली आणि ती पुराव्यासह राहुल गांधी यांनी दाखऊन दिली.”

ते म्हणाले, “आधी निवडणूक आयोगाकडे आम्ही माहिती मागितली, ती आम्हाला दिली जात नाही. पुरावे मागितले, आता राहुल गांधी यांनी पुरावे दिले. म्हणतात ना जुन्या बाटलीत नवी दारू? निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कधीच इतकी ढासळली नव्हती, थोडी तरी नीतिमत्ता ठेवून वागावे.”