मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदी विजेंद्र सिंह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दिल्लीत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी महसूल विभागाचे अधिकारी विजेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विभागीय संचालक पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांचा कार्यकाल 31 डिसेंबरला संपला होता. वानखेडे यांनी त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील अमली पदार्थ तस्करांवर कारवाई केली होती. क्रुझवरील ड्रग्स कारवाईदरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा सापडल्यामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते. समीर वानखेडे यांची दिल्लीत महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचे विभागीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.