
संत श्री गजानन महाराज (शेगाव) सेवा मंडळ, विक्रोळीतर्फे गेली 45 वर्षे संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळय़ाचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी बुधवार 23 फेब्रुवारी विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर 2, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सभागृह येथे हा सोहळा साजरा करण्यात येईल. सकाळी 8 वाजता प्रतिमेचे विधिवत पूजन केले जाईल. त्यानंतर 9ः30 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल. भाविकांनी या सोहळय़ाला उपस्थित राहावे, असे आवाहन गजानन महाराज (शेगाव) सेवा मंडळ, विक्रोळीचे अध्यक्ष प. म. राऊत यांनी केले आहे.

























































