विलेपार्ले येथील इमारतीच्या 13 व्या मजल्याला आग, एका महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील विलेपार्ले पश्चिममधील सुविधा पर्ल इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. या आगीत एका 63 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, एक महिला जखमी झाली आहे.

विलेपार्ले पूर्व येथील फिरोजशाह मेहता रोडवर असलेल्या ‘सुविधा पर्ल’ या इमारतीला सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास आग लागली. ही इमारत 13 मजल्याची होती व शेवटच्या मजल्यालाच आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी पोहोचले. ​दुपारी १२:५२ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. दरम्यान या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या होत्या. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. भावना सत्रा असे त्या महिलेचे नाव आहे.