
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुआ यांनी दिली आहे. दुआ यांना जानेवारीमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती दिवसोंदिवस नाजूक बनत आहे. विनोद दुआ सुरुवातीपासूनच साधे जीवन जगले असून हीच शिकवण त्यांनी आम्हाला दिल्याचे मल्लिका यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना आणखी कोणताही त्रास होऊ नये हीच अपेक्षा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी अशी विनंती मल्लिका यांनी केली आहे.

























































