गुप्त मतदान पद्धतीचे सैन्याकडून उल्लंघन?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लडाख

हिंदुस्थानी सैन्यदलाच्या काही कमांडिंग ऑफिसर्सनी गुप्त मतदान प्रक्रियेचे उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत निवडणूक उपायुक्त अवनी लवासा यांनी गुप्त पद्धतीने मतदान होत नसल्यास तो एक गुन्हाच आहे. मतप्रक्रियेचे पावित्र्य भंग पावणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार मतप्रक्रियेत होता कामा नये. ते खपवता येणार नाहीत असे पत्रच लवासा यांनी 14 कॉर्प्सला जीओसीला लिहिले आहे, मात्र सैन्यदलाने या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सैन्यातील जवान पोस्टल बॅलेट पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावत असतात. मात्र काही तुकडय़ांच्या प्रमुखांनी जवानांना मतपत्रिका दिल्याच नाही. त्याऐवजी तुम्ही कोणाला मत देणार असे विचारत वरिष्ठांनी परस्पर त्यांच्या मतपत्रिका पाठवून दिल्या अशी तक्रार  लडाखमधील अपक्ष उमेदवार सज्जाद हुसैन आणि अजगर अली करबालाई यांनी  केली आहे.