गुजरातच्या खंबात तालुक्यात उफाळला हिंसाचार; 25 घरांना आग, 12 जण जखमी

1459

गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत असताना दुसरीकडे खंबात तालुक्यात दोन गटांत हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात 25 घरे जाळण्यात आली आहेत. तसेच संतप्त जमावाने दुकाने आणि गाड्यांनाही लक्ष्य केले आहे. या वादाचे नेमके कारण अजून कळालेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जानेवारी रोजी दोन गटांत हाणामारी झाल्याने वाद वाढला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता. परंतु रविवारी दोन्ही गटांत पुन्हा वाद झाले आणि वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले. जमावाने 25 घरांना आग लावली. तसेच अनेक दुकान आणि गाड्यांनाही आग लावण्यात आली. या हिंसाचार 12 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारानंतर 100 पोलिसांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रूधुराचा माराही केला. अजूनही या भागात तणावपूर्ण शांतता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या