माणसांनो, शिका काहीतरी… माकडाने पाणी पिऊन झाल्यावर नळ केला बंद

सोशल मीडियावर विविध प्राण्यांचे व्हिडियो नेहमी व्हायरल होत असतात. हत्ती, मांजर, श्वान, अस्वल आदींचे मजेशीर व्हिडियो नेटीजन्सला खूप आवडतात. सध्या माकडाचा असाच एक छानसा व्हिडियो लोकांच्या पसंतीला उतरला आहे. या व्हिडियोतून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. उन्हाच्या काहिलीने तहानलेलं एक माकड नळावर पाणी पिताना दिसतंय.

माकड नळ सुरू करून पाणी पिऊ लागतं आणि स्वतःची तहान भागवल्यावर तिथून जाण्यापूर्वी आठवणीने नळ घट्ट बंद करतं. हा व्हिडियो आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी शेअर केला. व्हिडियोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलंय, स्मार्ट मंकी… पृथ्वीवर पाण्यासारखा नैसर्गिक स्रोत मर्यादित आहे.

जेवढी गरज असेल तेवढेच वापरा. कोणतीही गोष्ट फुकट घालवू नका, याचीच शिकवण माकड देत आहे. नेटीजन्सला स्मार्ट माकडाचा व्हिडियो खूप आवडत आहे. ते पाणी वाचवण्याचा संदेश देणाऱया माकडाचे भरभरून कौतुक करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या