
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला एका दगडावर महाकाय पक्षी उभा असल्याचे दिसत आहे. या अनोख्या व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा पक्षी लोकांना रामायणातील ‘जटायू’ची आठवण करून देत आहे. रस्त्यावरून जाणारे लोक या दुर्मिळ पक्ष्याचे फोटो काढताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारा पक्षी प्रत्यक्षात गिधाडाची एक दुर्मिळ प्रजाती अँडियन कॉन्डोर आहे. या प्रजाती दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांमध्ये आढळतात. सहसा असे पक्षी मानवी गर्दीपासून दूर राहतात, परंतु या व्हिडीओमध्ये दिसणारा पक्षी केवळ रस्त्याच्या कडेलाच उपस्थित आहे असे नाही, तर त्याला गर्दीचा अजिबात त्रास होत नाही असे दिसते. @swetasamadhiya नावाच्या युजर्सने हा व्हिडीओ शेअर केला.