आजोबांनी ब्लेडशिवाय केली दाढी

जुगाड करण्यात हिंदुस्थानी अव्वल असतात. अशाच एका हटके जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दाढी करताना पुरुष वस्तरा किंवा रेझरचा वापर करतात. दोघांमध्येही ब्लेडचा वापर केलेला असतो. मात्र ब्लेडमुळे चेहऱयावर जखम होण्याची शक्यता असते. यातून वाट काढण्यासाठी एका आजोबांनी भन्नाट शक्कल लढवली आहे. व्हायरल होणाऱया व्हिडीओत आजोबा दाढी करताना दिसतायेत. त्यांनी काडय़ा आणि दोरा यांचा वापर करून दाढी करण्याचे उपकरण तयार केलेय. रेझरमधल्या ब्लेडच्या जागी त्यांनी दोऱयाचे अनेक धागे जोडले आहेत. या दोऱयांमुळेच वस्तऱयाने जशी दाढी होते तशीच तुळतुळीत दाढी होताना दिसतेय.

आपली प्रतिक्रिया द्या