
बाज की नजर और चिते की चाल… अर्थात, शिकारी पक्ष्याची नजर आणि चित्त्याच्या चालीची किंवा चपळाईची बरोबरी कुणीही करू शकत नाही असं म्हणतात. यातल्या शिकारी पक्ष्याच्या नजरेचा अंदाज लावणं तसं कठीण असतं. पण चित्त्याच्या चपळाईचा अनुभव आपण अनेकदा घेतलेला असतो. ‘चित्ता नुसता धावत नाही तर अदृश्य होतो’ असं त्याच्या वेगाचं वर्णन करताना म्हटलं जातं. चित्त्याच्या याच चपळाईचा पुरावा देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंह चित्त्याची शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेला दिसत आहे. चित्त्याला सिंहाची चाहूल लागते आणि तो असा काही पळतो की जंगलाचा राजा सिंह हतबल होऊन जातो. शिकार काही त्याच्या हाती लागत नाही. हा व्हिडीओ https://tinyurl.com/426yzbfj या लिंकवर पाहता येईल.



























































