Viral – प्रेयसीसमोर अशा गोष्टी चुकूनही करू नका…

4738

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. असं असलं तरी अनेकदा प्रेमाचा अगदी विचका होण्याची शक्यता असते. तुम्हाला वाटत असेल की स्वभावामुळे प्रेमात अडथळा निर्माण होण्याबद्दल कदाचित बोललं जात असेल. तर तसं अजिबात नाही. ‘स्वभाव जुळतीलही पण सवयी…?’

तुम्हाला ‘लग रहो मुन्नाभाई’ मधील ‘गांधीगिरी’वाला तो प्रसंग आठवतो आहे का? ज्यामध्ये वेटरला शूकSS शूकSS म्हणून बोलवल्यामुळे मुलगी मुलाला नापसंत करते. मान्य की त्यांचं प्रेम नसतं पण अनेकदा अशा सवयींमुळे प्रेमाचाही विचका होतो. प्रियकराच्या सवयींबद्दल जसजसं प्रेयसीला कळत जातं तसतसं त्यांच्यातील दुरावा वाढत जातो आणि काही वेळा अगदी ब्रेकअपपर्यंत या गोष्टी जातात. व्हॉट्सअॅपवरून सध्या यासंदर्भातील काही मेसेज फॉरवर्ड होत आहे. गंमतीचा भाग म्हणून नाही तर त्यावर थोडा विचार ही होणं गरजेचं आहे.

त्यामुळे प्रियकरांनो या गोष्टी करणं टाळा!

* प्रेयसीसमोर इतर मुलींचे, मैत्रिणींचे कौतुक टाळा

girl-friend-boy-friend-list

प्रेयसीसोबत बोलत असताना इतर मुलींचा किंवा आपल्या मैत्रिणींचा विषय फारसा काढू नका. तुमची मैत्री जरी निखळ असली, तरी समोरच्या व्यक्तीला तिच्याबद्दल फारसं माहीत नसल्याने नको ती शंका घेण्यास ते कारणीभूत ठरू शकतं.

* इकडे तिकडे बघू नका
gf-bf

प्रेयसीला भेटण्यासाठी गेले असाल तर तिला पूर्ण वेळ द्या. इकडे-तिकडे बघू नका. कारण आपल्या प्रियकराचं आपल्याकडे लक्षं नाही म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीचा संताप होऊ शकतो. एखादेवेळी ती समोर व्यक्त होईलच असं नाही पण भविष्यातील नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

* भेटायला जाताना ब्रश न करता जाऊ नकाmen-toothbrush

अनेकदा काही ऑफिसवरून परताना किंवा संध्याकाळी युगुलं भेटतात. अशा वेळी दिवसभराचा थकवा, जेवणात उलटसुलट खाणं यामुळे तोंडाला एकप्रकारची दुर्गंधी येत असते. अशावेळी दोघांमधील संवादात त्याचा अडथळा येऊ शकतो त्यामुळे ब्रश न करता जावू नका. दिवसात दोन किंवा तीन वेळा ब्रश करणं ही चांगली सवय असल्याचे बोलले जाते.

* प्रेयसी समोर ‘हवा का झोका’ सोडू नकाfart-new

‘हम दिल दे चुके सनम’ मधील ‘समीर… थंडी हवा का झोका’ हा डायलॉग तुम्हाला आठवला असेलच. अर्थात ही नैसर्गिक बाब आहे. पण त्यावर नियंत्रण आणणं शक्य आहे. असा त्रास असल्यास डॉक्टरांचे सल्ले घ्या, भरपेट खाणं किंवा सारखं चबरचबर खाणं टाळा. हे तुमच्या स्वास्थ्यासाठी देखील चांगले आहे.

* खाताना कुणासमोर ढेकर देऊ नकाburp

चाट खाताना किंवा जेवताना अनेकदा बोलणं सुरू असताना मध्येच ढेकर येतो. एखाद्या व्यक्तीला असं कुणासमोर ढेकर देणं आवडत नसेल तर ती तुम्हाला भेटण्यास फारशी उत्सुकता दाखवणार नाही, असंही घडू शकतं. त्यामुळे टेबलं मॅनर्स थोडं पाळणं आणि अगदी भरपेट जेवणापेक्षा लाईट खाणं उत्तम. हलक्या आहारावर तर तज्ज्ञांचाही जोर असतो.

* तिच्या म्हणण्याविरुद्ध बोलणं टाळा2

एकमेकांसोबत बोलतांना हे नेहमी लक्षात ठेवा की समोरच्याला पटणार नाही अशा गोष्टी आपल्यात असणारच. सर्वच गोष्टींवर एकमत होईल असं नाही. मात्र त्याच गोष्टी धरून बसणं हे योग्य नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याविरुद्ध बोलणं टाळा.

* पूर्व प्रेयसी असल्यास तिचा सारखा उल्लेख करू नकाdont-think-ex-gf

एखादेवेळी पूर्व प्रेयसी असू शकते. तिच्याबद्दल थोडी माहिती देऊन आपलं नातं पारदर्शक करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तर चांगलंच. पण सारखा तिचा उल्लेख करू नका. समोरच्या व्यक्तीच्या भावना त्यामुळे दुखावल्या जाऊ शकतात. सतत त्या व्यक्तीचा उल्लेख म्हणजे तुम्ही तिच्यात अजूनही गुतले आहात असं वाटू शकतं, त्यामुळे नात्यात दूरावा होऊ शकतो त्यामुळे भूतकाळ फार कुरवाळू नका. पुढं पाऊल पडलं आहे ते जपा.

* प्रेयसी बोलत असताना तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकाdont-ignor-girlfriend

प्रेयसी बोलत असताना तिच्या बोलण्याकडे लक्ष द्या. दुर्लक्ष करू नका. नाहीतर समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल काही ‘फिलींग्स’ नाहीत असं वाटण्याची शक्यता अधिक आहे.

* भेटीवेळी मोबाईलमध्ये तोंड खूपसू नकाmob-chat

मोबाईल अतिवापराची सवय लागल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र एकमेकांना समोर भेटणं, एकमेकांना वेळ देणं अधिक महत्त्वाचं आहे. अशावेळी मोबाईलमध्ये अडकल्यास नात्याला दुखावल्यासारखं आहे. त्यामुळे शक्यतो महत्त्वाची कामं उरकून मग थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीला वेळ द्या.

सोशल मीडियात प्रेमीयुगुलांच्या नात्यावर विविध चर्चा सध्या रंगताहेत. त्याच आधारावर ही बातमी आहे. प्रेमीयुगुलांना एकमेकांपासून सवयी लपवण्यास सांगणं हा या मागचा उद्देश मुळीच नसून त्यांचं प्रेम, नातं अधिक घट्ट व्हावं म्हणून सवयी बदलण्याचा प्रयत्न करवा, चांगल्या सवयी अंगी बाणाव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या