विरारमध्ये हायऍलर्ट तीन दिवसांत डेंग्यूचे तीन बळी

312

पावसाचा जोर कमी होताच विरारमध्ये डेंग्यूने डोके वर काढले असून तीन दिवसांत तीन जणांचा बळी घेतला आहे. बळींमध्ये वृद्धेसह दोन महिला आणि चौदा वर्षीय मुलाचा समावेश आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन बळी जात असल्याने शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान स्वच्छतेसाठी वसई-विरार महापालिका कोटय़वधी रुपये खर्च करत असतानाही डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रमिला नाईक (64), वंदना पाटील (35) आणि आकाश विश्वकर्मा (14) अशी डेंग्यूने बळी घेतलेल्यांची नावे आहेत. बोळींज येथे राहणाऱया प्रमिला नाईक यांना ताप आल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारात काहीच फरक पडत नसल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलाकती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये प्रमिला यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याच दिवशी विजय वल्लभ रुग्णालयात कंदना पाटील यांचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला. वंदना हिला मंगळवारी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर नालासोपारा पूर्वच्या प्रगतीनगर येथील तुलसी अपार्टमेंट राहणाऱया आकाश विशवकर्मा या मुलाचा गुरुवारी डेंग्यूने बळी घेतला.

पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 15 रुग्ण आढळले आहेत.

वसई-विरार शहरातील मनवेल पाडा, जळबाववाडी, कारगील नगर, तुळींज रोड, आचोळे तलाक व संतोष भवन या परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत.

बदलापूरमध्ये पाच रुग्ण आढळले

बदलापूर – जुलै, ऑगस्ट महिन्यात पुरात बुडालेल्या बदलापूरवर डेंग्यूने हल्ला चढवला आहे. शहरातील एकाच इमारतीत डेंग्यूसदृश पाच रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण मुंबई येथे तर दोन रुग्ण बदलापुरात उपचार घेत आहेत. शहर तापाने फणफणले असताना डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या