Video – खराब कामगिरीने पाहुणे वैतागले, विराट कोहली व बेन स्टोक्समध्ये मैदानावर बाचाबाची

टीम इंडिया व इंग्लंडमध्ये आज चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. लागोपाठ दोन कसोटी हरलेल्या इंग्लंडची चौथ्या कसोटीची सुरुवातही खराब झाली आहे. अक्षर पटेल व मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला असून 78 धावात चार गडी गमावले आहेत. याच दरम्यान विराट कोहली व बेन स्टोक्समध्ये मैदानावर बाचाबाची झाली. त्या दोघांमध्ये पंचांना मध्यस्थी करावी लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात संधी मिळालेल्या मोहम्मद सिराजने त्याच्या संधीचे सोने केले. 12 व्या षटकात सिराज गोलंदाजी करायला आल्यावर त्याने पहिल्याच बॉलवर जो रूटला बाद केले. टीम इंडियासाठी ही मोठी विकेट होती. त्यानंतर आलेल्या बेन स्टोक्सला सिराजने पहिला चेंडू टाकला. तो चेंडू एजला लागून स्लीपच्या दिशेने गेला. मात्र सुदैवाने तो बचावला. मात्र त्यामुळे सिराज वैतागला व तो स्टोक्सकडे पाहून काहीतरी बडबडला. त्यामुले स्टोक्स चिडला. ती ओव्हर पूर्ण झाल्यानंतर स्टोक्सने याबाबत विराटला सांगितले. त्यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद वाढायच्या आधीच मैदानावरींल पंचांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले.

आपली प्रतिक्रिया द्या