आम्ही इथे दुःखी आणि हा बायकोसोबत फिरतोय! विराट कोहलीवर कडाडले चाहते

124

सामना ऑनलाईन । मुंबई

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाद झाल्यानंतर सध्या हिंदुस्थानी क्रिकेट संघात उदास वातावरण आहे. विश्वचषकाचं स्वप्न पाहणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांची निराशा झाली आहे. या निराशेची झळ हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला बसली असून पत्नीसह लंडन फिरल्यामुळे चाहते त्याच्यावर टीका करत आहेत.

virat-troll

उपांत्य फेरीत रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या तिघांनीही फलंदाजीत निराशा केली. अवघी एक एक धाव काढून हे तिघेही माघारी परतले आणि त्यामुळेच हिंदुस्थानी फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे तमाम चाहते या तिघांवर आधीच उखडले होते. त्यात विराट हिंदुस्थानात परतण्याऐवजी पत्नी अनुष्कासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत लंडनमध्ये फिरताना दिसला. त्याचे फोटो व्हायरल झाले आणि चाहत्यांची सटकली. त्यांनी विराटवर टीका करायला सुरुवात केली.

virat-troll1

‘आम्ही इथे विश्वचषक न मिळाल्याच्या दुःखात होतो आणि तू तिथे बायकोसोबत फिरतोयस. तुला लाज वाटायला हवी’, अशा शब्दांमध्ये नेटकऱ्यांनी विराटला ट्रोल केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या