विराटचा राजेशाही थाट; लंडनमध्ये दिली फिटनेस टेस्ट, बीसीसीआयच्या निर्णयामुळे खळबळ

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. आता तो फक्त वन डे क्रिकेट खेळणार असून आगामी आशिया कप स्पर्धेसाठी तो मैदानात उरण्यासाठी सज्ज आहे. तत्पूर्वी त्याने फिटनेस टेस्टही दिली आहे. मात्र इतर खेळाडूंप्रमाणे बंगळुरू ऐवजी त्याने लंडनमध्ये फिटनेस टेस्ट दिली आहे. यामुळे मोठा गदारोळ उडाला आहे.

आशिया कपपूर्वी बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना फिटनेस टेस्ट देण्यास सांगितले होते. त्यानुसार रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंनीही बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस टेस्ट दिली. मात्र विराट कोहली याला लंडनमध्ये फिटनेस टेस्ट देण्याची परवानगी दिली आणि त्याची तिथे टेस्टही झाली. तो या टेस्टमध्ये पास झाला आहे. मात्र विराटच्या या राजेशाही थाटवरून आता गदारोळ उडाला असून त्यावर सवाल उपस्थित होत आहे.

विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये आहे. तिथेच तज्ज्ञांच्या देखरेखीमध्ये त्याने फिटनेस टेस्ट दिली. त्यामुळे विराटसाठी प्रोटोकॉल बदलण्यात आले का? त्याला वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ‘दैनिक जागरण’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आशिया कपमध्येही कुलदीपकडे दुर्लक्ष होऊ शकते, फिरकीवीर मनिंदर सिंह यांना चिंता