विराटच्या कबड्डी संघात धोनी, जाडेजा आणि पंत, मात्र रोहितला स्थान नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी प्रो कपड्डी लीगमध्ये यू मुंबा आणि पुणेरी पल्टन लढतीला हजेरी लावली. यावेळी रॅपिड फायर राऊंड अंतर्गत त्याला अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. विराट कोहलीला हिंदुस्थानच्या संघातील खेळाडूंमधून एक कबड्डी संघ निवडण्यास सांगण्यात आले. विराटने धोनी, जाडेजा आणि पंतला आपल्या संघात स्थान दिले, परंतु ‘हिटमॅन’ रोहित शर्माला मात्र संघात स्थान दिले नाही.

हिंदुस्थानच्या संघातून कबड्डी संघ निवडायचा ठरल्यास तू कोणत्या सात खेळाडूंची निवड करशील? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. विराटने खूप विचार करून कबड्डी संघ निवडला. एम.एस. धोनी, रविंद्र जाडेजा, ऋषभ पंत, उमेश यादव, के.एल. राहुल आणि जसप्रीत बुमराहला विराटने आपल्या संघात स्थान दिले. परंतु रोहित शर्माला मात्र संघात स्थान दिले नाही.

आपल्या संघाबाबत बोलताना विराट म्हणाला की, कबड्डीसाठी ताकद आणि चपळपणा आवश्यक आहे. धोनी, जाडेजा, यादव, पंत हे मजबूत आहे, तर बुमराह टो टचसाठी उपयोगी पडेल. परंतु यात मी स्वत:च्या नावाचा समावेश करणार नाही. कारण हे सर्व खेळा़डू माझ्यापेक्षा जास्त मजबूत आणि अॅथलेटिक आहेत, असेही विराट म्हणाला. यावेळी विराटने राहुल चौधरी आपला सर्वात आवडता कबड्डीपटू असल्याचे म्हणाला.