व्हायरल होतेय विराट कोहलीची ‘नवी पोस्ट’! म्हणतोय, मिळाला ‘सुंदर दोस्त’

1368

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ सध्या न्युझिलंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाच्या संघाने न्यूझीलंड दौऱ्यात टी-20 मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश मिळवलं आहे. 21 फेब्रवारीपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. सध्या या दोन्हीं संघामध्ये सराव सामना सुरू असून त्या सामन्याचा रविवारी तिसरा दिवस आहे.

सराव सामन्यातून वेळ काढून अनेक क्रिकेटपटून थोडीशी गंमत जंमत शोधत असतातच. कधी सहकाऱ्यासोबत काही वेळ घालवून, तर कधी ड्रेसिंग रूमध्ये एकमेकांच्या खोड्या काढून क्रिकेटपटू मनावरचा ताण हलका करत असतात. असंच काहीसं कर्णधार विराट कोहली याने ठरवलं आणि एक धमाल फोटो व्हायरल केला आहे.

त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टखाली त्याने नवी पोस्ट, सुंदर दोस्त अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोमध्ये विराटसह मोहम्मद शमी व पृथ्वी शॉ देखील दिसत आहेत. तिघांनीही चेहऱ्यावर मजेशीर हावभाव केले आहेत. त्यामुळे ही धमाल पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या