सामना ऑनलाईन । राजकोट
हिंदुस्थानने राजकोटमध्ये महाविजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजवर 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र आयसीसीच्या नव्या नियमामुळे दोन्ही संघांतील खेळाडूंना त्रास झाल्यामुळे ही कसोटी चर्चेचा विषय बनली. याप्रसंगी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नव्या नियमाबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हटले की, ‘नव्या नियमानुसार 45 मिनिटे पाणी पिण्यास बंदी आहे. अशा उष्ण वातावरणात 45 मिनिटे पाणी न पिता फलंदाजी करणे मोठे आव्हानात्मक होते. त्यामुळे ‘आयसीसी’ भविष्यात नक्कीच या नियमावर विचार करेल, अशी आशाही कोहलीने व्यक्त केली.
कसोटी जिंकल्यानंतर बोलताना कोहली म्हणाला, ‘पृथ्वी आणि जड्डू (रवींद्र जाडेजा) यांच्या कामगिरीवर मी खूश आहे. या दोघांनी दमदार फलंदाजी केली. जाडेजाने याआधीही संघासाठी अनेकदा उपयुक्त फलंदाजी केली आहे.
























































