‘विराट कोहलीला भारतरत्न दिला पाहिजे…’, CSK च्या माजी खेळाडूची सरकारकडे मागणी

सचिन तेंडूलकरनंतर टीम इंडियाच्या महान खेळाडूंमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश केला जातो. विराटने 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यापूर्वी त्याने टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलं होतं. विराट कोहली IPL आणि वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेटसाठीच्या योगदानाचा सन्मान व्हावा म्हणून सुरैश रैनाने विराटला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

बंगळुरूचे नेतृत्व एक धक्काच, रजत पाटीदारने पॉडकास्टवर शेअर केली भावना

टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने Jio Hotstar ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराट कोहीलबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “हिंदुस्थानी क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल विराट कोहलीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं पाहिजे”. असं म्हणत सुरैश रैनाने सरकारकडे मागणी केली आहे. सध्याच्या घडीला सचिन तेंडुलकर एकमेव क्रिकेटर आहे, ज्याला 2014 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सुरैश रैनाच्या मागणीची सरकार दखलं घेणार का नाही? हे पुढील काही दिवसांमध्ये समजेलच. परंतु सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहलीची गणना टीम इंडियाचा सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून केली जाते. विराट कोहलीने आपल्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 123 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकं ठोकली असून 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत.