विराट कोहलीने शार्दुल ठाकूरसाठी केले मराठीत ट्विट, वाचा काय लिहलंय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया व वेस्ट इंडिजमध्ये झालेला तिसरा सामना जिंकून हिंदुस्थानने मालिकेवर 2-1 ने कब्जा केला. या सामन्यात विराटने 81 चेंडूवर 85 धावा केल्या मात्र शेवटच्या तीन षटकात शार्दुलने 6 चेंडूत केलेल्या 17 धावांनी कमाल घडवली व टीम इंडियाने सामना जिकंला. शार्दुलच्या त्या दोन चौकार व एका षटकाराच्या खेळीची स्तुती करण्यासाठी विराटने ट्विटरवरून त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत ‘तुला मानला रे ठाकूर’,असे मराठीत शेअर केले आहे.

तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर रोमहर्षक विजय मिळवला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत टीम इंडियापुढे 315 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेवटची चार षटकं बाकी असताना टीम इंडियाला 30 धावांची गरज होती. विराट कोहली व रविंद्र जाडेजा मैदानावर होते त्यामुळे हिंदुस्थान हा सामना जिंकणारच असे वाटत असतानाच 46 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट बाद झाला. त्यानंतर आलेल्या शार्दुलने पहिल्याच चेंडूला चौकार मारला. त्यानंतर शेवच्या तीन षटकात टीम इंडियाला 22 धावांची गरज होती. त्यावेळी शार्दुलने एक षटकार व एक चौकार लगावून टीम इंडियाला विजयाच्या जवळ नेले. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाने 48.4 षटकात 316 धावा करत विजय मिळवला.