
मुंबईकरांची सोमवारची सकाळ हलक्या थंडीने झाली. त्याचबरोबर धुक्याच्या दाट थराने शहराला वेढून टाकले. मुंबईचा हवेचा दर्जा चिंतेत टाकणारा होता. सकाळी शहराचा एक्यूआय 200 ते 250 दरम्यान नोंदवला गेला, तर काही भागांत तो 255 पर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. प्रदूषणामुळे अनेक ठिकाणची दृश्यमानता कमी झाली.
मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध हवामान संकेतस्थळांच्या नोंदीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या 8 दिवसांत मुंबईत एक्यूआय बहुतेक वेळा 100 ते 180 दरम्यान राहिला. तथापि, काही दिवशी एक्यूआय 200 च्या पुढे गेला. यामुळे मुंबईवर प्रदूषणाचा अधिक परिणाम दिसून आलाय. 8 डिसेंबर रोजी सकाळी हवा पुन्हा ‘अनहेल्दी’ असल्याची नोंद झाली आहे. एक्यूआय अनेक भागांत 200 तर काही ठिकाणी 250 च्या वर होता.
मुंबईतील हिवाळ्यात हवेची गुणवत्ता सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक हवा-खेळती परिस्थिती सध्या कमी आहे. रात्रीचे ं तापमान झपाटयाने खाली येते आणि सकाळी सूर्य उगवल्यावरही हवेच्या खालच्या थरात प्रदूषक अडकून राहतात. हलकं वारं, समुद्रकाठचा दमटपणा, वाहने व बांधकामांमधून येणारी धूळ यामुळे प्रदूषणात आणखी वाढ होते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
सोमवारी सकाळी वांद्रे एक्स्लेमेशन आणि परिसरात दृश्यमानता कमी होती. परिसर धुरक्यात हरवला होता. या भागात एअर क्वालिटी इंडेक्स 125 राहिला. हा इंडेक्स ‘मोडरेट’ श्रेणीमध्ये नोंदवला गेला. यामुळे अस्थमाच्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो.



























































