श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार, मंदिर व्यवस्थापनाचा निर्णय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या 30 सप्टेंबर पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. याबाबत मंदिराचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी भाविकांच्या माहितीसाठी प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

मंदिर खुले करावे यासाठी कालच आंदोलन झाले होते मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला. गेल्या 22 मार्चपासून विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. अनलॉक चार’मध्ये धार्मिक स्थळे आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मंदिर समितीने आज पत्राद्वारे मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या