सामना प्रतिनिधी । पंढरपूर
दिवाळीतील पाडव्याचे औचित्य साधून आज महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचा गाभारा विविध रंगाच्या मनमोहक अशा पानाफुलांनी सजवण्यात आला आहे.
दिवाळी हिंदुस्थानच्या सण उत्सवांमध्ये सर्वांत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या निमित्ताने विठूमाऊलीच्या दर्शनासाठी आलेले वारकरी भाविकांना देवाच्या दर्शन तर सुखावत आहेच त्यासोबत मंदिरातील फुलांची आकर्षक सजावट देखील आकर्षणाचा विषय ठरली आहे.
या उत्सवात श्री विठ्ठल रखुमाईला भरजरी पोशाख आणि रत्नजडीत दागिने घातले जातात. देवाचं हे गोजिरवाणे रुप डोळे भरून पाहण्यासाठी भक्तांची मंदिरामध्ये रीघ लागली आहे.
पाहा व्हिडीओ:
































































