
व्होडाफोनने बाजारामध्ये दोन नवे रिचार्ज प्लॅन्स Vodafone Recharge Plans आणले आहेत. हे दोन्ही प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी असून याची किंमत 398 आणि 558 इतकी आहे. या दोन्ही प्लॅनची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूयात
558 रुपयांचा Vodafone चा प्लॅन
- 3 जीबी हायस्पीड डेटा
- कोणत्याही नेटवर्कच्या ग्राहकांशी बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग
- दिवसाला 100 एसएमएस
- वैधता- 56 दिवस
याशिवाय हा प्लॅन निवडणाऱ्याला व्होडाफोन प्ले vodafone play आणि Zee5 मोबाईलवर पाहता येणार आहे. vodafone play ची सुविधा 499 वाल्या प्लॅनवर उपलब्ध आहे तर Zee 5 ची सुविधा 999 चा प्लॅन वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.
398 रुपयांचा Vodafone चा प्लॅन
- 3 जीबी हायस्पीड डेटा
- कोणत्याही नेटवर्कच्या ग्राहकांशी बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग
- दिवसाला 100 एसएमएस
- वैधता- 28 दिवस
हा प्लॅन मुंबई आणि मध्य प्रदेश सर्कलसाठीच लागू करण्यात आला आहे. 558 रुपयांचा प्लॅन हा फक्त मध्य प्रदेश सर्कलसाठीच लागू करण्यात आला आहे.
व्होडाफोनने 19 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केले आहेत. यामध्ये आता जास्त डेटा मिळणार आहे. पूर्वी या प्लॅनमध्ये 150 एमबी डेटा दिला जात होता आता 200 एमबी डेटा दिला जाणार आहे. यामध्ये कोणत्याही नेटवर्कच्या ग्राहकांशी बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग असलं तरी या प्लॅनची वैधता फक्त 2 दिवस आहे.
























































