पुण्यात 15 ठिकाणी मतमोजणी होणार

पुणे महापालिका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पंबर कसली आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस उरले असल्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप प्रचंड वाढले आहेत. एकीकडे राजकीय पक्षांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून मतदानाची तयारी केली जात आहे. पुण्यात एकूण 4 हजार 11 मतदान केंद्रे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी असणार आहेत. यामध्ये 13 हजार 882 मतदान यंत्रांद्वारे एकूण 15 ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.